Vedgangela Flood: Three feet water on Nidhori Murgud, Shindevajdi road
मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला आहे. वेद गंगेच्या पुराचे पाणी राधानगरी निपाणी या राज्यमार्गावर निढोरी मुरगूड व शिंदेवाडी या दरम्यान रस्त्यावर आले आहे.  शिंदेवाजडी रस्त्यावर तीन फूट पाणी
कोल्हापूर

Kolhapur Monsoon Update : वेदगंगेला पूर : निढोरी मुरगूड, शिंदेवाडी रस्त्यावर तीन फूट पाणी

पुढारी वृत्तसेवा

मुदाळतिट्टा : सध्या होत मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला आहे. वेद गंगेच्या पुराचे पाणी राधानगरी निपाणी या राज्यमार्गावर निढोरी मुरगूड व शिंदेवाडी या दरम्यान रस्त्यावर आले आहे. निढोरी मुरगुड दरम्यान सुमारे साडे तीन फुट पाणी आल्याने येथून होणारी वाहतूक बंद पुर्णपणे झाली आहे. शिंदेवाडी येथे एक फूट पाणी आले आहे.

दरम्यान मुरगूड स्मशान शेड ते पेट्रोल पंप असे अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्यावर पाणी आहे. मुरगुडच्या सर पिराजी तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने येथून दौलतवाडीकडे जाणारी वाहतुक ही बंद झाली आहे. मुरगूड निढोरी दरम्यान असणाऱ्या पुराच्या पाण्यातुन रात्री दोन ट्रक घालण्यात आले. परंतु, ते पाण्यातच अडकले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पुढे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ते रात्रभर पाण्यात उभे करावे लागले. सकाळी जेसीबीच्या साह्याने या ट्रकना पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

सध्या निढोरी मुरगूड मार्गावर वाहतूक बंद असल्याने पर्यायी मुरगुड-चिमगाव-गंगापुर-मडिलगे-कुर या मार्गे गारगोटी कोल्हापूर अशी वाहतूक सुरू आहे. निढोरी कागल मार्गे वाहतुकीसाठी खुला आहे. मुरगुड निपाणी मार्गावर वाहतूक सुरळीत सध्या सुरू आहे. पण पाणी वाढ झाली तर हा मार्ग सुद्धा बंद होणार आहे. सध्या मुरगूड शहराच्या चारी बाजून पाणी असल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त झाले.

मुरगुड सेनापती कापशी मार्गावर असणारा सर पिराजी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होत असल्याने मुरगूड कापशी मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मुरगूड होऊन कापशी ला जाण्यासाठी चिमगाव अवचित वाडी बोलावी बोलावी वाडी बेलेवाडी मार्गे कापशी असा पर्यायी मार्ग सुरू आहे.

SCROLL FOR NEXT