Father Francis Dibrito : ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

हरित वसईच्या संरक्षणासाठी केला होता आयुष्यभर संघर्ष
Veteran Marathi Literary Father Francis Dibrito passed away
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज सकाळी (दि.25) निधन झाले.Father Francis Dibrito

मुंबई : हरित वसईच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज सकाळी (दि.25) निधन झाले.

फादर दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्व आणि पर्यावरण चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फादर दिब्रिटो त्यांचे पार्थिव आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी 6 च्या सुमारास होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news