कोल्हापूर

कोल्हापूर : अंबप येथे दोन दारू अड्ड्यावर छापे; दोघांना अटक

मोहन कारंडे

कासारवाडी; उत्तम वडिंगेकर : अंबप (ता. हातकणंगले) येथे दोन ठिकाणी अवैद्य दारू विक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आले आहे.

सोमवारी दुपारी पेठवडगाव पोलिसांनी अंबप येथील मातंग वसाहत व धनगर गल्ली येथे अचानक छापा टाकला. यावेळी संशयित सतीश दाभाडे व कोंडीबा वाघमोडे यांच्याजवळ अवैद्य दारू विक्रीसाठी ठेवलेली सापडली. यामध्ये रोख रक्कम व दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त करत मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या परिसरात अवैद्य दारूची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अनेकवेळा याबाबत तक्रारी झाल्या होत्या. ग्रामसभेने अवैद्य दारू विक्री व्यवसायाच्या विरुद्ध ठराव केले होते. तरीही हा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाबद्दल 'दै. पुढारी'तून वृत्त प्रसिद्ध होताच ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सलगर, पो. हवालदार गजानन घोडके, पो.हे.को. तात्यासाहेब मुंढे, हवालदार पो.कॉ. पोपट माने यांनी केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT