कोल्हापूर

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये भरदुपारी साडेबारा लाखांची घरफोडी

दिनेश चोरगे

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : येथील भाग्येश किरण भोसले यांच्या अर्बन कॉलनीतील घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख ४ लाख रुपयांसह साडेबारा लाख रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना आज (दि.२५) भरदुपारी तीन ते पाचच्या दरम्यान घडली. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे गडहिंग्लजमधील घरफोड्यांचे सत्र पुन्हा चर्चेत आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भाग्येश हे पत्नीसह बाहेरगावी गेले होते. तर त्यांच्या घरातील नातेवाईक कोल्हापूरला गेले होते. या सगळ्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला व तिजोरीतील दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारला. घरी आल्यानंतर घऱात चोरी झाल्याचं निदर्शनास येताच भाग्येश यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला बोलावून घेतले. मात्र त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. दरम्यान या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT