कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीनंतर तुळशी विवाहाची आतुरता घरोघरी असते. तुळशी विवाहाच्या सोहळ्याने दिवाळीची खर्या अर्थाने सांगता होते. कार्तिकी एकादशीनंतर द्वादशीच्या उदयतिथीला बुधवारी सकाळी साडेदहानंतर तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. दरम्यान तुळशी विवाहासाठी लागणार्या पूजा साहित्य व फुलांच्या खरेदीसाठी मंगळवारी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. शहरातील मिरजकर तिकटी, निवृत्ती चौक, बिंदू चौक, राजारामपुरी, शाहूपुरी, कसबा बावडा या परिसरात उस, झेंडू फुलांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच फळे, बेंडबत्तासे, रेडिमेड फराळ, लाह्या, चिंच, आवळे, सौभाग्यविडे यांचीही बाजारपेठ गजबजली.
वैकुंठ चतुर्दशीनिमित्त रात्री बारा व पहाटे तीन वाजता महादेवाला 108 बेलपत्र, 360 तुळशीपत्र, फुलवाती वाहण्याचे व—त महिला करतात. यासाठी बाजारपेठेत बेल व तुळशीच्या पेंड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
सकाळी 10 वाजून 43 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 4 मिनिटांपर्यंत तसेच दुपारी 4 वाजून
7 मिनिटांपर्यंत व रात्री 8 वाजून 46 मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे. दुपारी 12 वाजून 4 मिनिटांपासून
1 वाजून 25 मिनिटांपर्यंत अमृत मुहूर्त आहे. दुपारी 2 वाजून 46 मिनिटांपासून 4 वाजून 7 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे.