तुळशी घाटातील दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

वलौते येथे घरावर वीज कोसळली; भिंगळोलीत रस्त्यावर पाणी, वाहतूक विस्कळीत
The work of clearing the crack in Tulsi Ghat is going on at war level
मंडणगड येथे ओढ्याला आलेले पाणी समर्थ नगरमध्ये घुसले आणि तुळशी घाटात कोसळलेली दरडPudhari File Photo

मंडणगड, पुढारी वृत्तसेवा : मंडणगडमध्ये दि. 21 जून रोजी रात्रीच्या वेळी दमदार झालेल्या पावसाने तालुक्यात सरासरी 105 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नागकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील दिवसाच्या पावसामुळे तुळशी घाटात रस्त्यावर आलेली दरडी बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील वलौते गावात संतोष पवार यांच्या घरावर वीज पडल्याची घटना घडली. यामुळे संतोष पवार व पत्नी सुप्रिया पवार यांना विजेचा झटका लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वीज पडल्याने संतोष पवार यांच्या घराचे अंदाजे 15,500 रुपये इतके नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नोंद कण्यात आली आहे. विजय जाधव यांच्या घराचे पूर्णतः नुकसान झाले, त्यांचे 50 हजार नुकसान झाल्याची पंचनाम्यात नोंद आहे. तळेघर येथील शरद आंजर्लेकर यांच्या घराचे 35 हजारांचे अंशतः नुकसान झाले आहे. पाट येथील विलास दिवेकर यांच्या घराचे सहा हजाराचे अंशतः नुकसान झाले आहे.

The work of clearing the crack in Tulsi Ghat is going on at war level
मुंबई : घाटकोपर येथील वाल्मिकी नगरात दरड कोसळली

पावसामुळे भिंगळोली येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात आलेल्या पाणी रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली. हाच ओढा पुढे भिंगळोली समर्थनगर येथून जातो, ओढ्याच्या पाण्यामुळे समर्थनगर येथील घरांभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचले व येथील रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने समर्थनगरमधील जनजीवन काही काळ पाण्यामुळे प्रभावित झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या पावसामुळे तुळशी घाटात रस्त्यावर आलेली दरडी बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

The work of clearing the crack in Tulsi Ghat is going on at war level
सातारा : ‘अजिंक्यतारा’ भोवती दरड संरक्षक भिंत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news