कोल्हापूर

जयसिंगपूरलगच्या वसाहतीतील झोपडपट्ट्या पेटवल्या

निलेश पोतदार

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा; येथील शहरालगत असलेल्या धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील गट नं. 343 मधील गेल्या अनेक वर्षापासून भटक्या जमातीमधील नागरीक राहत आहेत. तर या झोपडपट्टीतील नागरिकांना या जागेवरून उठविण्यासाठी मोठे प्रयत्न असतानाच सोमवारी मध्यरात्री येथील झोपड्या पेटविण्यात आल्या आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या जीवघेण्या प्रकारामुळे या वसाहतीचा परिसर भीतीच्या छायेखाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील लमाण वसाहतीमध्ये महावितरणला वीज कनेक्शन देण्यासाठी सर्व पुर्तता करूनही अचानकपणे काही बिल्डरच्या दबावामुळे वीज कनेक्शन देण्याचे काम थांबवले होते. ही व्यथा लमाण वसाहतीतील महिला नागरीकांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमोर मांडल्यानंतर तात्काळ वीज कनेक्शन द्या. असा आदेश यड्रावकर यांनी तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ व महावितरणचे अधिकारी वैभव गोंदील यांना दिले होते.

तर येथील लमाण वसाहतीमधून या नागरिकांना हुकूमशाही व दहपशाही करून धनदांडगे काही बिल्डरांच्याकडून या नागरीकांवर अन्याय केला जात आहे. अशातच आता सोमवारी मध्यरात्री येथील झोपडपट्टीत काहींनी आग लावून दिल्याने यात 2 झोपड्या जळाल्या आहेत. तर नागरिकांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणून इतर आग आटोक्यात आणली. यात दोन झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर पोलिसांनी तात्काळ गोरगरिबांच्या जीवावर उठणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांची आहे.

हे ही वाचलंत का?  

SCROLL FOR NEXT