ब्राँझ पदक विजेती सानिया सापळे Pudhari Photo
कोल्हापूर

गारगोटी : नेमबाज सानिया सापळेची ब्राँझ पदकाला गवसणी

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा

थायलंड येथील शूटिंग स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय ओपन शूटिंग चॅम्पियन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये गारगोटी येथील सानिया सुदेश सापळे हिने ब्राँझ पदकासा गवसणी घातली आहे. सानिया १० मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात ब्राँझ पदकाची मानकरी ठरली. ही स्पर्धा बँकॉक येथे ९ ते १८ सप्टेंबर या कालावधीत पार पडली. यानंतर तिला थायलंडच्या पंतप्रधान स्कोन वानपॉग यांचे हस्ते गौरवण्यात आले.

या स्पर्धेदरम्यान नेमबाज सानिया हिने ऑलिंपिक नंतरची दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा समजली जाणारी कोरीया येथे झालेल्या ज्युनिअर जागतिक चॅम्पियनशिप रायफल शुटिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया जुनिअर ५० मिटर थ्री पोझिशन पॉईंट टू टू रायफल प्रकारात ती सुवर्ण पदकाची दावेदार बनणार होती, मात्र गुणाच्या तांत्रीक अडचणीमुळे तिला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पॉईंट टू टू ५० मिटर प्रोन रायफल शुटिंग चाचणीत तिची दक्षिण कोरिया येथील आंतरराष्ट्रीय ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली होती. सानिया आंतरराष्ट्रीय कोच सद्गुरुदास, राधीका बराले यांच्या मार्गदर्शनाखाली शुटिंग चा सराव करते. तसेच के. आय. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष साजीद हुदली, डॉ. मोहन वनरोटी, सौरभ जोशी यांचे सहकार्य लाभले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT