कोल्हापूर : जागतिक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेसाठी अनुष्काची निवड

कोल्हापूर : जागतिक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेसाठी अनुष्काची निवड
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जागतिक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेसाठी कोल्हापूरची नेमबाजपटू अनुष्का रवींद्र पाटील हिची भारतीय संघात निवड झाली. जर्मनी – सूल येथे दि. 9 ते 20 मे या कालावधीत स्पर्धा होईल. यात अनुष्का 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात सहभागी होणार आहे.

नॅशनल रायफल असोसिएशन तर्फे प्रथमच मुलींसाठी झालेल्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तल प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा भोपाळ (मध्यप्रदेश) येथे घेण्यात आली. यात अनुष्काने निवड चाचणी 1 व 2 मध्ये अनुक्रमे 551 व 548 असे एकूण 1099 गुणांची कमाई केली. निवड स्पर्धेच्या रँकिंगनुसार पहिल्या पाच क्रमांकाची मुलींची निवड भारतीय संघात झाली. यात अनुष्का पाटीलसह रिदम सांगवा (हरियाणा), नाम्या कपूर (दिल्ली), निवेदिता नायर (तामिळनाडू) यांचा समावेश आहे. अनुष्काने यापूर्वी विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत. अनुष्का क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर साखरे, पुणे प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील, नवनाथ फडतरे, ऑलिम्पिक विजेते गगन नारंग, पवन सिंग आदींचे मार्गदर्शन लाभले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news