कोल्हापूर

५१ हजार मोत्यांचे शिवलिंग; मुरगुडमध्ये ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात उभारणी

backup backup

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुरगूडच्या वतीने 'महाशिवरात्री ' महोत्सव निमित्याने शनिवारी (दि. १८) ५१ हजार मोत्यांचे व ७ फूट उंचीचे शिवलिंग देखावा बनविण्यात आला होता. परमपिता परमात्मा शिवाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बाळासाहेब इंदलकर (मुरगूड). सुधाकर पाटील( कुरणी), अनिल मगदूम(निढोरी), दयानंद लुगडे, श्यामजी पटेल , विश्वनाथ गुरव,(मुरगूड), गीता पाठशाला निढोरी, चिमगाव, कुरणी, शाहूनगर, अवचितवाडी चे भाई बहन उपस्थित होते

दिनांक १८ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ब्रह्माकुमारी सेंटर ज्ञानेश्वर कॉलनी मुरगूड येथे देखावा खुला असून दि १८ फेबुवारी २०२३ रोजी शेकडो भाविकांनी शिवलिंग दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी ब्रह्माकुमारी सेंटर मुरगुडच्या बी. के लता बहेनजी यांनी सांगितले की परमपिता परमात्मा शिव पवित्र सृष्टी स्थापन करणेसाठी अवतरीत झाले आहेत . प्रजापिता ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय (माउंट आबू ,राजस्थान) १४२ देशात ईश्वरीय ज्ञान व सहज राजयो गाच्या माध्यमातून नैतिक मुल्यांचे प्रसार करण्याचे कार्य करत आहे.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT