तळेगाव परिसरात महाशिवरात्र उत्सव सोहळा | पुढारी

तळेगाव परिसरात महाशिवरात्र उत्सव सोहळा

तळेगाव (पुणे): तळेगाव स्टेशन परिसरातील श्री हरणेश्वर टेकडीवर महाशिवरात्री निमित्त श्री हरणेश्वर(श्री महादेव) मंदिर येथे भाविकांची दर्शनासाठी सकाळ पासूनच गर्दी झालेली होती. सतत हर हर महादेव! असा जयघोष होत होता. सकाळी राजेंद्र नवले यांचे हस्ते महाअभिषेक करण्यात आला. दुपारी महाआरती आणि शंख वाजविणे आदी धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी अनेक भाविक उपस्थित होते.

यशवंत नगर येथेही श्री महादेव मंदीरात दर्शनासाठी शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तळेगाव आंबी रोडवरील श्री भागुजीबाबा गवळी (श्री महादेव)मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बुधवारपासून शनिवारपर्यंत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेकांचे प्रवचन आणि किर्तन झाले. येथेही भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. मंदीर परिसरात शिवभक्तीची गीते लावण्यात आलेली होती. शिवमय वातावरण झाले होते.

Back to top button