Shirol Flood
खासदार माने यांनी कुरुंदवाड व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली Pudhari
कोल्हापूर

Shirol Flood Updates : कुरुंदवाड व परिसरातील पूरग्रस्त भागाची खासदार माने यांच्याकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कृष्णा पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढ होत असल्याने शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील खिद्रापूरपासून शिरोळपर्यंत पंचगंगा आणि कृष्णा नद्या रस्त्यावर आल्या आहेत. कुटुंबे स्थलांतर होत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रांत अधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. (Shirol Flood Updates)

दरम्यान, गोठणपूर परिसरातील पूरग्रस्त महिलांशी संपर्क साधून त्यांना धीर देत सुरक्षेची ग्वाही दिली. कुरुंदवाड येथील शिवतीर्थ गोठणपूर परिसर एस पी हायस्कूल येथील निवारा केंद्राची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार माने म्हणाले, अजून महिनाभर पावसाचे वातावरण आहे. पावसाच्या आणि पाण्याच्या विसर्गामुळे प्रशासनाचे कंट्रोल आहे. महापुरामुळे घरगुती आणि शेतीचे नुकसान झाल्यास ते नुकसान भरपाई करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असणार आहे. महापुराची पाणीपातळी आणखीन वाढल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनानुसार स्थलांतर व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान, अधिकारी बबन पटकारे, सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, तलाठी प्रतीक्षा ढेरे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT