Shaktipeeth Protest pudhari
कोल्हापूर

Shaktipeeth Protest: मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांनो २४ तास पोलीस संरक्षण नसणार, वैयक्तिक दुश्मनी नको; राजू शेट्टींचा इशारा

Shaktipeeth Express Way Protest: राजू शेट्टींनी आता जमीन वाचवण्यासाठी महिलांनी आंदोलन हातात घेण्याचे केले आवाहन

Anirudha Sankpal

Shaktipeeth Mahamarg Protest: शक्तीपीठ महामार्गाचे आंदोलन आता तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे. नुकतेच भुदरगडमध्ये मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांचे साहित्य शेतकऱ्यांनी पेटवून देत प्रशासनासोबतच्या संघर्षाची ठिणगी टाकली आहे. आता याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोजणी करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, 'शक्तीपीठ मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांनो तुम्हाला २४ तास पोलीस संरक्षण असणार नाही. शेतकऱ्यांसोबत वैयक्तीक दुश्मनी घेऊ नका.' राजू शेट्टी यांनी ज्यांची जमीन जाणार आहे आणि त्यांची जमीन जाणार नाही त्यांना देखील मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा आणि आता महिलांनी शेती वाचवण्याची मोहीम हातात घ्या असे देखील आवाहन केलं.

मोजणीसाठी मोठा फौजफाटा

खानापूर तालुक्यात घानवड भाग्यनगर हिंगणगादे ते माहुली यादरम्यान प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीची मोजणी आज होत आहे. त्यासाठी विटा ते माहुली रस्त्यावर गार्डी पासून माहुली पर्यंत संपूर्ण पोलिसांचा मोठा फौज फाटा मागविण्यात आला आहे.

खासदार राजू शेट्टी, दीपक लाड यांच्या सह हजारो कार्यकर्ते या मोजणीला विरोध करताना दिसत आहेत त्याचवेळी दुसरी कडे विटाच्या महसूल भवनांमध्ये या शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी संदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. विटा शहरांमध्ये पोलीस व्हॅन आणि पोलिसांच्या असंख्य गाड्या तसेच हजारो सुसज्ज आणि सशस्त्र पोलीस तैनात आहेत.

शेतकऱ्यांनी केला तीव्र विरोध

शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या मोजणीविरोधात आज आजरा तालुक्यातील पोळगाव, खानापूर, एरंडोळ येथे महसूल विभागाचे अधिकारी पोलिसांचे संरक्षण घेऊन मोजणीसाठी आले होते. मात्र या भागातील शेतकऱ्यांनी या मोजणीला तीव्र विरोध केला. पेरणोली आणि हरपवडे येथेली शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला.

सरकार आम्हाला उद्ध्वस्त करायला निघालं आहे

यावेळी शेतकऱ्यांनी सरकार आम्हाला उद्ध्वस्त करायला निघालं असल्याची भावना बोलून दाखवली. शेतकऱ्यांनी तहसीलदार समीर माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्याकडे मोजणी बदं करण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाने ६० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

कोणतीही पूर्वसुचना न देता रेखांकन संकलन सुरू केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ विरोधात घोषणा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT