कोल्हापूर

दर शनिवारी भरणार दप्तराविनाच शाळा!; पहिली ते आठवीचा समावेश

अनुराधा कोरवी

कोल्हापूर : प्रवीण मस्के : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आता आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहे. येत्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासूनच याची अंमलबजावणी होणार आहे.

दिनांक १५ जून रोजी नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू नये, याची खबरदारी घेत असून, वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने शाळा सकाळी ९ वाजता भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता आठवड्यातील पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे दिले जाणार आहेत. 'आनंददायी शनिवार अंतर्गत दप्तरविना विद्याथ्यांना शनिवारी शाळेत बोलावले जाणार आहे.

आनंददायी शनिवारी विद्यार्थ्यांना प्राणायम, योगा, ध्यानधारणा, ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाईड, पर्यावरण रक्षण, रस्ते सुरक्षा यासह कृती व खेळ यावर आधारित विषय शिकवण्यात येणार आहेत.

शनिवारी नेमके काय करायचे, याचा आराखडा तयार करण्याचे काम राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद व शिक्षण आयुक्त कायर्यालयाकडून सुरू आहे.
-शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT