कौस्तुभ गावडे Pudhari photo
कोल्हापूर

Kaustubh Gawade|'सीएचबी' प्राध्यापकांच्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडे

Kaustubh Gawade CHB professors issues Kolhapur- मानधनवाढ, सेवास्थैर्य, ११ महिन्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) मानधनवाढीसह सेवास्थैर्य, मूळ वेतन, रजा आणि ११ महिन्यांच्या नियुक्तीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दिली.

गावडे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन प्राध्यापक व शिक्षकांशी संवाद साधला. सीएचबी प्राध्यापकांनी सेवाविषयक समस्या व अडचणी मांडल्या. राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मानधनातील मर्यादा, नियुक्तीतील अनिश्चितता व आवश्यक सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षे अध्यापन करूनही सेवेला स्थैर्य मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे गावडे यांनी नमूद केले.

'सीएचबी' प्राध्यापकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ११ महिन्यांची नियुक्ती मिळावी, यासाठी मुलाखतींची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र प्राध्यापकांना अॅड-हॉक पूर्णवेळ नियुक्ती आणि मूळ वेतन देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे वाढलेल्या अध्यापन कार्यभारानुसार आवश्यक प्राध्यापकपदांना मान्यता मिळावी, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'सीएचबी' प्राध्यापकांच्या समस्या अजेंड्यावर

सीएचबी प्राध्यापक हे उच्च शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसह सेवास्थैर्याचा प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा, हाच येणाऱ्या काळात अजेंडा असेल, हे गावडे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT