

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी कोल्हापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी देऊन प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणार आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गावडे यांनी दिली.
कोल्हापूर शहर दौऱ्यात महावीर महाविद्यालय, नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय या संस्थांना भेट देण्यात आली. याप्रसंगी शिक्षकांच्या समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, शिक्षणाचा दर्जा व भविष्यातील आव्हानांवर चर्चा झाली. शिक्षक शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळवून देणे, प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी समन्वय साधणे आवश्यक आहे, अशी भूमिका गावडे यांनी मांडली. शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महावीर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी, डॉ. गोमटेश पाटील आणि मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. नेहरू हायस्कूलमध्ये गणी आजरेकर, रफीक शेख आणि मुख्याध्यापक काजे यांच्याशी शैक्षणिक प्रश्नांवर विचारविनिमय करण्यात आला. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये चेअरमन डॉ. मंजिरी अजित मोरे-देसाई, दौलत देसाई, प्रा. जयकुमार देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य वाय. डी. पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, डॉ. अनिल मालगुडे, डॉ. के. एन. देसाई व डॉ. राहुल मांडणीकर यांनी गावडे यांचे स्वागत केले.