Kaustubh Gawade | शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच : कौस्तुभ गावडे

, Pune teacher constituency- शिक्षकांचा वेळ विद्यार्थ्यांसाठी खर्च व्हावा; स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेसाठी पाठपुरावा करणार
कौस्तुभ गावडे
कौस्तुभ गावडेPudhari photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस धोरणात्मक निर्णयांचा पाठपुरावा करणार असल्याची स्पष्ट भूमिका पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षकमित्र कौस्तुभगावडे यांनी मांडली. शिक्षकांचा मौल्यवान वेळ, कागदपत्रे, माहिती संकलन व ऑनलाईन पोर्टलवरील नोंदींमध्ये खर्च होण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वापरला गेला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.

शिक्षकांवरील प्रशासकीय कामांचा ताण जागतिक स्तरावरील प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार विविध शिक्षण व्यवस्थांमधील सरासरी ५२ टक्के शिक्षकांनी प्रशासकीय कामांना कामाशी संबंधित तणावाचे एक कारण असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना अध्यापनासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज कौस्तुभगावडे यांनी अधोरेखित केली.

इंग्लंडमधील 'टीचर वर्कलोड रिडक्शन टास्कफोर्स'च्या धर्तीवर महाराष्ट्रात शिक्षकांच्या कामाच्या भाराचा अभ्यास करणार आहे. तो कमी करण्यासाठी स्वतंत्र धोरणात्मक यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी ते शासनाकडे करणार आहेत.

तसेच, सिंगापूरमधील प्रशासकीय सहाय्य व्यवस्थेच्या धर्तीवर शाळांमध्ये प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ व सहाय्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्याची भूमिका आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता स्वतंत्र शासन निर्णय, कालबद्ध अंमलबजावणी व प्रभावी प्रशासकीय व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कौस्तुभ गावडे
Kaustubh Gawde | शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध : कौस्तुभ गावडे

शिक्षकांनी शिकवावे, विद्यार्थ्यांनी शिकावे आणि शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय कामांचा भार कमी करून त्यांना आवश्यक सुविधा व अध्यापनासाठी अनुकूल वातावरण मिळवून देण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा राहील.

- कौस्तुभ गावडे, उमेदवार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ

कौस्तुभ गावडे
Kaustubh Gawade| कौस्तुभ गावडे यांना राजकीय पक्ष, शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्थांचा वाढता पाठिंबा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news