Pune Bangalore highway accident Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur accident: चालकाला डुलकी लागली अन् अनर्थ घडला! पुणे-बेंगळूर महामार्गावर ट्रेलरला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक

Pune Bangalore highway accident: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक सोमवारी पहाटे मिनी ट्रॅव्हल्स अपघात झाल्याने १३ प्रवासी जखमी झाले.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Pune Bangalore highway accident

नागाव: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक सोमवारी पहाटे मिनी ट्रॅव्हल्स अपघात झाल्याने १३ प्रवासी जखमी झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील एका आयटी कंपनीतील कर्मचारी कर्नाटकातील गोकर्ण, महाबळेश्वर दर्शन करून परत पुण्याकडे जात होते. पुण्याकडे जात असताना त्यांची मिनी ट्रॅव्हल्स तावडे हॉटेल, पंचगंगा नदी ओलांडून पटेल हॉल समोर आली असता चालकाला डुलकी लागून गाडीवरील नियंत्रण सुटले व थेट समोर चाललेल्या ट्रेलरला पाठीमागून धडकली आणि ट्रॅव्हलर थेट सेवा रस्त्यावर आली. यामध्ये ट्रॅव्हलरच्या पुढच्या भागाचा चक्काचुर झाला आहे. या धडकेत १३ जण जखमी झाले आहेत.

जखमीची नावे पुढीलप्रमाणे: सायली शिंदे (वय २१ रा. संगमनेर), पवण शिंदे (वय २४ रा. संगमणेर), मोनाली गरपवार (वय ४९ रा. पुणे), मयुरी देवरे (वय २१ रा. अहिल्यानगर), सुरभी वांगी (वय ३० रा. पुणे), माधुरी मोहिते (वय ३० रा. पुणे), प्रतिक्षा गायकवाड (वय २६ रा. पुणे), सुलक्षणी गायकवाड (वय २३ रा. कळवा ठाणे), आदेश इंगळे (वय २२ रा. पुणे), गणेश दवरे (वय ३० रा. अहिल्यानगर), राज शिंकाले (वय २४ रा. नाशिक), अनिकेत डोलारे (वय २३ रा. पुणे), प्रविण शिंदे (वय २३ रा. पुणे) अशी जखमींची नावे आहे.

घटना समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ बाहेर काढून सीपीआर येथे पाठवीले. या घटनेची नोंद सीपीआर चौकी व शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT