Jalgaon accident: कावड यात्रेदरम्यान भरधाव ट्रकने ८ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले; संतप्त जमावाने ट्रक पेटवला

मृतदेह रस्त्यावर ठेवून नागरिकांचे आंदोलन, घटनास्थळी प्रचंड तणाव
Jalgaon accident
Jalgaon accident
Published on
Updated on

जळगाव : ममुराबाद रस्त्यावरील प्रजापती नगराजवळ सोमवारी (दि.24) एका भरधाव ट्रकने आठ वर्षांच्या बालकाला जागीच चिरडल्याची अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली. कावड यात्रेच्या उत्साहात देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या चिमुकल्याला काळाने घाला घातला. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात संतप्त लाट उसळली होती, संतप्त नागरिकांनी थेट अपघातग्रस्त ट्रक पेटवून देत आपला रोष व्यक्त केला.

Jalgaon accident
Jalgaon accident: जळगाव बायपासवरील खड्ड्यांनी घेतला दुसरा बळी; तरुणाचा अपघातात मृत्यू

अपघातात चालकालाही किरकोळ दुखापत झाली असून, पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. मात्र, या घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने मृत बालकाचा मृतदेह थेट रस्त्यावर ठेवून चक्काजाम केला. "संबंधित ट्रकचालकाला तातडीने घटनास्थळी आणून आमच्या स्वाधीन करा," अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली होती.

Jalgaon accident
Jalgaon Car Accident | काळ आला होता; पण...! विदगावच्या तापी पात्रात कार कोसळली, ४ प्रवासी बालंबाल बचावले

इतकेच नव्हे तर, माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पेटलेला ट्रक विझवण्यापासून जमावाने रोखून धरले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने घटनास्थळी मोठा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सध्या पोलिसांकडून संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले काही काळा नंतर परिसरात शांतता निर्माण झाली होती मात्र तरी सुद्धा अत्यंत तणावपूर्ण वातावरण होते . त्या ठिकाणी रात्री बंदोबस्त लावलेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news