Mahipalgad Car Accident | कार कड्यावरून कोसळूनही तिघे बचावले

महिपाळगडावरील घटना : तरुण बेळगावचे, कार झुडपात अडकल्याने वाचला जीव
Mahipalgad Car Accident |
महिपाळगड : गडाच्या कड्यावरून कोसळलेली कार.
Published on
Updated on

चंदगड : उंच कड्यावरून वीस फूट कोसळलेली कार केवळ झुडपांत अडकल्याने त्यात असलेले तिघेजण सुदैवानेच बचावल्याची घटना सोमवारी (दि. २४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महिपाळगडावर (ता. चंदगड) घडली. बचावलेले तिघे तरुण बेळगावचे असून त्यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय आहे.

बेळगाव परिसरातून अनेक तरुण विरंगुळा म्हणून महिपाळगडावर सायंकाळच्या वेळी येतात. सोमवारी सायंकाळी असेच काही तरुण गडावर आले होते. महिपाळगड ते देवरवाडी या रस्त्याला लागून १०० मीटर अंतरावर बाजूला एक उंच कडा आहे. या कड्याची खोली शेकडो फूट आहे. या कड्यानजीकच कार पार्क करून तिघेजण त्यात बसले होते; पण कार अचानक उतारावरून घसरली व कड्यावरून कोसळली. सुदैव म्हणजे ही कार अवघ्या २० फुटांवरच झाडी- झुडपामध्ये अडकून तिथेच अडकली. त्यामुळे कारमधील तिघांचा जीव वाचला. घटनास्थळावरून तिन्ही तरुण या कारमधून बाहेर येऊन वर चढले.

मंगळवारी (दि. २५) सकाळी क्रेनच्या साहाय्याने कार वर काढण्यात आली. कार बाहेर काढल्यानंतर त्यात मद्याच्या बाटल्याही आढळल्या. त्यामुळे स्थानिकांतून संताप व्यक्त करण्यात आला. मद्याच्या नशेत नियंत्रण सुटल्याने कार कड्यावरून कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news