कोल्हापूर

हुपरी : …अन्यथा मशिदीसमाेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावणार; मनसेचा इशारा

मोनिका क्षीरसागर

हुपरी पुढारी वृत्तसेवा : हुपरी शहरातील मशिदीवरील भोंगे उतरवण्यात यावेत, अन्यथा आज (दि .५) सायंकाळी ५ वाजता मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर  हनुमान चालिसा  लावली जाईल, असा इशारा हुपरी शहर व हातकणंगले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने हुपरी पोलिस ठाण्याला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मनसेच्‍या निवेदनात म्हटले आहे की, " मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली जाईल. पत्रकावर नगरसेवक दौलतराव पाटील , गणेश मालवेकर , नगरसेवक अमर गजरे  , पद्माकर चौगुले , सुहास यादव , सागर गायकवाड , दिपक गजरे , आदी अनेक पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT