कोल्हापूर

निपाणी : हालसिद्धनाथ यात्रेची सांगता उत्साहात; पाच दिवसात लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन

backup backup

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी- कुर्ली येथील श्री. हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची सांगता शनिवारी सायंकाळी उत्साहात झाली. गेल्या पाच दिवसापासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळणे असे कार्यक्रम झाले. यावेळी भक्तांकडून मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

गुरुवारी पहाटे नाथांची पहिली व शुक्रवारी पहाटे दुसरे भाकणूककार भगवान डोणे, महाराज यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे, महाराज यांनी खडक व घुमट मंदिर येथे तिसरे अखेरचे भाकणूक कथन केले. गेल्या पाच दिवसात या यात्रेसाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. यात खडक मंदिरात शुक्रवारी रात्री नाथांची 5 ते 7 या वेळेनंतर घुमट मंदिर येथे शनिवारी सकाळी 9.30 ते 11.30 वा.भाकणूक झाली.

शुक्रवार दिवसभर महानैवद्याचा कार्यक्रम व शनिवारी सकाळी घुमटातील भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कर तोडून यात्रेची सांगता करण्यात आली. दरम्यान वालंग कार्यक्रम देखील पार पडला. सायंकाळी ५.३० वा. उत्सवस्थळी ढोल वादन व अखंड भंडाऱ्याची उधळण झाली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिना सोहळ्याची हालसिद्धनाथ व श्री. महालक्ष्मी मंदिर प्रदक्षिणा झाली.

त्यानंतर ६ वा. वाड्यातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली. त्यानंतर कुर्ली येथे देवाचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. गेल्या पाच दिवसापासून सुरू असणारी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पुजारी, मानकरी यात्रा कमिटी, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्टसह, स्वयंसेवक हॉटेल व्हाईट आर्मीचे कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केले.

दरम्यान गेल्या पाच दिवसात ना. शशिकला जोल्ले, खा.अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आ.काकासाहेब पाटील,प्रा.सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील, पंकज पाटील यांच्यासह बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवून श्री हालसिद्धनाथांचे दर्शन घेतले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT