पोलिसांनी संबंधित तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime | भुदरगड परिसरात खळबळ : विवाह ठरल्याने प्रियकराने प्रेयसीला दरीत ढकलले

भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी दरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला

पुढारी वृत्तसेवा

Bhudargad Lover Pushes Girlfriend Valley

कोल्हापूर : प्रेयसीचा विवाह ठरल्याच्या कारणावरून प्रियकराने तिचे अपहरण करून तिला नाईकवाडी येथील कड्यावरून दरीत ढकलल्याची घटना शनिवारी (दि.१०) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भुदरगड तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणीचा विवाह ठरला होता. याच कारणावरून तिच्या प्रियकराने तिला भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथील कड्यावर नेले. आणि तेथून तिला दरीत ढकलून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. प्रेयसीचा विवाह ठरल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT