Kolhapur Accident | मुरगूड-निढोरीदरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडले; अडकूरचा दुचाकीस्वार जागीच ठार

निढोरी पुलाजवळील वळणावर भीषण अपघात; कंटेनर पलटी
Murgud Nidhori Accident
Pudhari
Published on: 
Updated on: 

Murgud Nidhori Accident

मुरगूड : मुरगूड-मुदाळतिट्टा मार्गावरील निढोरी पुलाजवळील वळणावर भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती चंदगड तालुक्यातील अडकूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात शनिवारी (दि. १० ) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूहून आलेला दहा चाकी मालवाहू कंटेनर निपाणीमार्गे निढोरी येथून गोव्याच्या दिशेने जात होता. निढोरी पुलाच्या पुढील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पलटी झाला. याच वेळी समोरून येणारा दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडला. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातातील मृत दुचाकीस्वाराची ओळख अडकूर (ता. चंदगड) येथील रहिवासी म्हणून पटली असली, तरी त्याचे नाव समजू शकलेले नाही.

Murgud Nidhori Accident
Kolhapur Accident | तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक; तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर

क्रेनच्या साहाय्याने कंटेनर हटविण्याचे प्रयत्न

अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. कंटेनर पलटी झाल्याने आणि दुचाकीस्वार त्याखाली अडकल्याने बचावकार्य व वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले. दुपारपर्यंत क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते.

शनिवारी अमावस्या असल्याने या मार्गावर बाळूमामा भक्तांची मोठी वर्दळ होती. त्यामुळे अपघातस्थळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि अन्य पोलीस कर्मचारी प्रयत्न करत होते. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news