Kaustubh Gawade| गारगोटी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात

शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेटी; शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
Kaustubh Gawade
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गारगोटी येथे आबिटकर नॉलेज सिटी कॅम्पस, पाल, गारगोटीचे चेअरमन अर्जुन आबिटकर यांचा सत्कार करताना उमेदवार कौस्तुभ गावडे. समवेत संस्थेतील शिक्षक, पदाधिकारी. (छाया : नाज ट्रेनर)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी गारगोटी परिसरातील शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, संस्थाचालक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. विविध संस्थांना सदिच्छा भेटी देत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली.

आबिटकर नॉलेज सिटी कॅम्पस, पाल, गारगोटीचे चेअरमन तथा कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर व सद्‌गुरू बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळ, मुदाळचे कार्यवाह तथा सचिव विकास कृष्णराव पाटील यांची कौस्तुभ गावडे यांनी भेट घेतली.

भेटीदरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी, शिक्षकांच्या अपेक्षा व शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर विचारविनिमय झाला. शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील घटकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवण्यावर गावडे यांनी भर देण्याचे ठरले. पुणे विभागातील शिक्षकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याच्या उद्देशाने जनसंपर्क सुरू आहे.

यावेळी विक्रमसिंह आबिटकर, श्रीनिवास पाटील, दयानंद लोहार, आकाश पाटील, सचिन जाधव, सतीश गौड, कृष्णात पाटील, शिवाजी पाटील, नारायण जाधव, निवृत्ती गुरव, किशोर बर्गे, राजेंद्र व्हटकर, शहीद वीरपत्नी लक्ष्मी संकुलचे संचालक प्रशांत पालकर, उपप्राचार्य सचिन लोहार, आनंद गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब व्हरकट आणि सिद्धिविनायक आयटीआयचे संस्थापक मनोज आळेकर आदी उपस्थित होते.

logo
Pudhari News
pudhari.news