कोल्हापूर

महाराष्ट्र केसरीचं स्वप्न पूर्ण केलं अन् पृथ्वीराज गदा कुशीत घेऊन झोपला ; फोटो व्हायरल

अविनाश सुतार

सातारा : पुढारी वृत्तसेवा : आपण सगळेच स्वप्न पाहतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो. आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मनाला जे समाधान मिळतं ते काही औरच. असंच काहीसं दिसून आलंय महाराष्ट्राची मानाची गदा पटकावणाऱ्या पृथ्वीराज पाटीलच्या बाबतीत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यश मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याच सर्वत्र कौतुक होतंय. पण सध्या त्याची सर्वात जास्त चर्चा होतेय ती, त्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यानंतर पृथ्वीराज रात्री मिळालेल्या मानाच्या गदेला बिलगून झोपला. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तब्बल २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद कोल्हापूरकडे गेलं. कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज पाटील २०२२ चा महाराष्ट्र केसरीचा विजेता झाला. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावलीय अंतिम सामन्यात विशाल बनकरवर त्यानं ५-४ ने मात केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी एकच जल्लोष केला. मैदानात पृथ्वीराजचे कुटुंबीय उपस्थित होते. पृथ्वीराजच्या विजयानंतर त्याची आई आणि आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. आई आणि आज्जीच्या आनंदाला पारावार उरला नाही. आज्जीनं गर्दीतच नातवाचे मटामटा मुके घेतले. त्यानंतर सर्वांनी मिळून पृथ्वीराजचा विजय साजरा केला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळलेला पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला. सध्या त्याचे पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु असून अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक आहेत.

दरम्यान, शनिवारी साताऱ्यातल्या शाहू क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना झाला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाईं आदीसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींनीही तोबा गर्दी केली होती.  पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यामधील देवठाणे गावचा आहे. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT