कुंभोज येथील आरगे मळ्यातील शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले  Pudhari
कोल्हापूर

Leopard Sighting Hatkanangale | कुंभोज येथे पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण

हातकणंगले तालुक्यातील कुंभोजसह परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली राहत आहेत

पुढारी वृत्तसेवा

Leopard in Kumbhoj Hatkanangale

कुंभोज : येथील आरगे मळ्यात गुरुवारी सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाले आहे. येथील नितीन आरगे हे ट्रॅक्टर घेऊन येत असताना बिबट्या ट्रॅक्टरच्या समोरून ऊसामध्ये गेल्याचे आरगे यांनी सांगितले. यावेळीच संजय मोरे यांच्या शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे कुंभोज येथील मळे भागातील नागरिकांनी , शेतकऱ्यांनी तसेच नवीन झालेल्या हजरत सकलातसो पीर ते नरंदे रोडवरून येणाऱ्या - जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ही घटना कळताच कुंभोज गावातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी कुंभोज येथे बिबट्याचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांनी त्या परिसरात रात्री अपरात्री मळ्यातील लोकांनी व शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे..

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, दानोळी, आळते, नेज, शिवपुरी, हिंगणगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरे बळी ठरत आहेत. या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे महिला व मजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतीचे काम ठप्प होण्याची वेळ आली आहे. सध्या शेतकरी शिवारात रात्रंदिवस कष्ट करत आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिलांचा व मजुरांचा सहभाग घटत आहे. शेतीचे काम खोळंबत असून वन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT