Kolhapur Doctor Protest| कुरुंदवाड येथे डॉक्टरवर हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर असोसिएशनच्या वतीने निषेध फेरी

लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिकांचा मोठा सहभाग; पोलिसांनी गस्त वाढवावी, रुग्णालयांना संरक्षण देण्याची मागणी
Doctor Association protest Kurundwad
Doctor Association protest KurundwadPudhari
Published on
Updated on

Doctor Association protest Kurundwad Kolhapur

कुरुंदवाड : कुरुंदवाड येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने भव्य निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांसह लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महात्मा बसवेश्वर चौकातून निषेधफेरीला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून ती पालिका चौकात पोहोचली. यानंतर या फेरीचे सभेत रूपांतर करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा मनीषा डांगे म्हणाल्या “कुरुंदवाडसह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी येथील दवाखाने आणि हॉस्पिटल ही जीवनावश्यक सेवा देणारी केंद्रे आहेत. 24 तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे.” त्यांनी पोलिस प्रशासनाने शहरात गस्त वाढवून विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णालयांवर नियमित तपासणी करावी, अशी मागणी केली.

Doctor Association protest Kurundwad
Kolhapur News : बाजार समितीत हापूस आंबा सौद्याचा मुहूर्त रद्द

मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित सुतार म्हणाले डॉक्टरांवरील हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी.” संबंधित आरोपीवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी करत तालुका वकील संघटनांना आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, डॉ. अमित माने, डॉ. उर्मिला देसाई, डॉ. अमरजा माने, जयसिंगपूर व शिरोळ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांनीही भाषणे करत घरामध्ये गांजा यासह अन्य नशा करणाऱ्या पदार्थामुळे युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे, यातूनच गुन्हेगारी वाढत आहे. यावरही अंकुश लावण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करत निषेध व्यक्त केला.

Doctor Association protest Kurundwad
Kolhapur News : अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात 16 बकऱ्यांचा मृत्यू

निषेध फेरीत उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, नर्सिंग असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news