बांबवडे : हारुगडेवाडी ता. शाहूवाडी येथे उसाच्य शेतात जिवंत पकडले, रात्री साडे सात वाजता ही घटना घडली. जिवंत बिबट्यास पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री साडे नऊ वाजता वनविभागाच्या रेस्क्यू टिमने त्यास ताब्यांत घेतले.
याबाबत आधिक माहिती अशी की हारुगडे वाडी येथील माळवाडी शेतात कुत्र्यांचा मोठा दंगा सुरु होता उसाच्या शेतात बिबट्यास गावातील कुत्र्यांनी त्यास घेरले होते, मोठा दंगा सुरु असल्याने गावातील तरुणांनी तिकडे धाव घेतली तर बिबट्या झाडावर चडला होता, तेथून तो खाली पडला त्याच वेळी गावातील तरुणांनी कुंत्र्यांच्या तावडीतून बिबट्यास सोडवून त्यास दोरीने बांधून ठेवले आणि वनविभागास यांची कल्पना दिली.
बिबट्यास जिवंत पकडले ही माहीती सर्व गावात पसरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली, दरम्यान सोशल मिडीया वरून ही माहिती पसरली त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान वन विभागाची टिम दाखल झाली त्यांनी बाधलेल्या बिबट्यास रेस्क्यू केले. बिबट्यास जिवंत पकडणाऱ्या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.