कोल्हापूर

Krishna Patil ShivBhakt Raigad: गेल्या २६ वर्षांत १,२६३ वेळा रायगड पायी चढून ४६,१०० जणांना घडवले दर्शन

शिवछत्रपतींच्या समाधीची अखंडपणे पूजा करणारे रायगडाचे वारकरी कृष्णा पाटील यांचे अनोखे शिवप्रेम

पुढारी वृत्तसेवा

चारणानगर (जि. कोल्हापूर) प्रकाश मोहोकर गेल्या २६ वर्षांत तब्बल १,२६३ वेळा रायगड स्वतः पायी चढून ४६,१०० जणांना गडाचे दर्शन घडविणारे कोलारपूर जिल्ह्यातील कृष्णा पाटील यांनी अनोखे शिवप्रेम जागविले आहे. २६ वर्षापासून ते रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीची अखंडपणे पूजा करत आहेत. प्रत्येक शिवजयंतीला स्वतः च्या घरी पालखी सोहळ्यासह शिवजयंतीचे आयोजन करणाऱ्या या सच्चा वारकप्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या अलौकिक कार्य, कर्तृत्वाने लोकशाहीचे स्वराज्य निर्माण केले.

अन्याय व जुलमी सत्तेविरोधात अखंडपणे लढा देत रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अद्वितीय पराक्रमांची गाथा सूर्य-चंद्र आहे तोपर्यंत गायली जाईल. मात्र, आजच्या तरुणाईला राजांचा जाज्वल्य इतिहास सांगून त्यांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न जाखले (ता. पन्हाळा) येथील शिवप्रेमी शिवजयंती विशेष कृष्णा पाटील हे करीत आहेत. उच्चशिक्षित असलेले कृष्णा पाटील लेखापरीक्षक म्हणून काम करता कृष्णा पाटील यांच्या नसानसांत लहानपणापासून शिवप्रेम ठासून भरलेले. याच शिवप्रेमापोटी या वारकण्याने २००१ पासून रायगडावर जाण्यास प्रारंभ केला. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते रायगडच्या पायऱ्या चढून गडावर जातात आणि

शिवसमाधीपुढे नतमस्तक होतात. कधी एकटेच, तर कधी परिसरातील शिवप्रेमींना घेऊन ते गडावर जात आठवडाभर मुक्काम करत रायगडाची स्वच्छता करतात. शिवसमाधी, जगदिश्वर मंदिर, होळीच्या माळावरील शिवछत्रपतींचा पुतळा, मेघडंबरी व शिकोई मंदिराची ते पूजा करतात, तसेच कर्नाटकातील शहाजी महाराज यांची समाधी, किल्ले पन्हाळगडाजवळील नेवापूर येथील शिवा काशीद, बाणूरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या समाधीचेही महिन्याच्या एका दिवशी पूजन करतात,

शिवछत्रपती व त्यांचे शेकडो मावळे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे. तो भावी पिढधांना कळाला तरच महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा टिकेल. या व्यक्तिमत्यांची चरित्रेय आणि विचार देशाला तारणारे आहेत. यामुळे त्यांचे स्मरण व त्यांच्या कायचि चिंतन होणे गरजेचे आहे. -
कृष्णा पाटील, जाखले, मि. कोल्हापूर

जाखले येथे जन्मोत्सव, पालखी सोहळा

गेली २७ वर्षे अखंडपणे प्रत्येक शिवजयंतीला जाखले येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी जन्मोत्सव, पूजन, पालखी सोहळा व दुपारी व्याख्याने आणि शिवभोजन घालून आगळी वेगळी शिवजयंती साजरी करतात. यामध्ये परिसरातील शिवभक्त उत्साहाने सामील होतात,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT