Mahad Maazi Vasundhara Abhiyan: ‘माझी वसुंधरा’ 5.0 मध्ये महाड नगर परिषद कोकणात अव्वल; 75 लाखांचे प्रथम पारितोषिक

घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि अक्षय ऊर्जेत उत्कृष्ट कामगिरी; सलग तिसऱ्या वर्षी पर्यावरणीय यश
Mahad Maazi Vasundhara Abhiyan
Mahad Maazi Vasundhara AbhiyanPudhari
Published on
Updated on

महाड : माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन “यांच्यामार्फत 17 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये महाड परिषदेने कोकण विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला असून 75 लाखांचे प्रथम पारितोषिक नगर परिषदेस प्राप्त झाले आहे.

Mahad Maazi Vasundhara Abhiyan
NGT Action on Illegal Mining: टाटा कॅन्सर हॉस्पिटलजवळ बेकायदा खाणकाम? एनजीटीची गंभीर दखल, संयुक्त समितीची नियुक्ती

माझी वसुंधरा अभियान 5.0 अभियान कालावधीमध्ये केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये 25 हजार ते 40 हजार लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदेच्या गटांमध्ये कोकण विभागात महानगर परिषदेने अव्वल क्रमांक प्राप्त केला. घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर, स्वच्छता उपक्रम ,जनजागृती यामध्ये महाड नगर परिषदेने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे.

Mahad Maazi Vasundhara Abhiyan
Raigad Mangrove Issue: रायगडातील ४,४११ हेक्टर कांदळवन वनविभागाकडे प्रलंबित; उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष?

चालू वर्षी सलग तिसऱ्या वर्षी महाड नगर परिषदेने या अभियाना अंतर्गत प्राप्त केलेल्या पारितोषकामुळे महाड मधील पर्यावरण प्रेमी संस्था तसेच नागरिकांकडून परिषद व प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Mahad Maazi Vasundhara Abhiyan
Matheran Alternative Road Demand: माथेरानला पर्यायी रस्त्याची प्रतीक्षा; 1962 पासून प्रलंबित पनवेल–माथेरान मार्गाचा प्रश्न ऐरणीवर

यापूर्वीच्या अभियानातही अव्वल

महाड नगर परिषदेने यापूर्वी माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये कोकण विभागात भूमी या थिमॅटिक मध्ये प्रथम क्रमांक पटकावून 1.50 कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले असून माजी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये देखील कोकण विभागात अव्वल क्रमांक पटकावून 75 लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news