Vishalgad  Encroachment  Protest
आंदोलकांच्या हल्ल्यात मुस्लीमवाडीत वाहनांची मोडतोड झाली आहे. Pudhari News Network
कोल्हापूर

Vishalgad Encroachment | विशाळगड: हल्ला झाला, पंचनामा झाला, आता भरपाईची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी रविवारी झालेल्या आंदोलनात ज्याचा संबंध नाही, अशा गजापूरच्या मुस्लीमवाडीत आंदोलकांनी हल्ला करून बसवलेली दहशत सोमवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. दुकाने व घरांच्या तोडफोडीनंतर आज प्रशासन, लोकप्रतिनिधी येतील, या आशेवर होती. पण सर्व प्रशासकिय यंत्रणा विशाळगडावर धावली. त्यामुळे येथील तोडफोड झालेली घरे व दुकाने पाहत बसण्याची वेळ येथील आपतग्रस्त कुटुंबावर आली. 

Summary

  • गजापूरच्या मुस्लीमवाडीत दुसऱ्या दिवशीही शांतता

  • ३ कुटुंबातील ६ चारचाकी, ८ दुचाकींची मोडतोड

  • शासकीय कर्मचाऱ्यांकडून नुकसानीची नोंद

भरपाईची शाश्वती नसल्याने संसार उघड्यावर

विशाळगड व गजापूर या दरम्यान डोंगराच्या कुशीत साठ कुटुंबाची ही वस्ती असून येथे प्रभुलकर, गोलंदाज, सारवान, गडकरी कुटुंबे मोलमजुरी व किरकोळ व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. या घरातील काही तरुण मुंबई व परदेशात मिळेल ते काम करीत आहेत. अशा वस्तीवर आलेले संकट प्रत्येकाच्या मनात धडकी भरवणारे ठरले.  रस्त्यालगत असलेल्या रेश्मा प्रभुळकर यांच्या घर व दुकानाला पेटून दिल्याने अख्खे कुटुंब हाताशपणे बसले होते. विशाळगड अतिक्रमणाशी आमच्या वस्तीचा काडीचाही संबंध नसताना आम्हाला जमावाने लक्ष करून आमचा संसार व उदरनिर्वाहाचे साधन उघड्यावर पडले आहे. सोमवारी रात्री शासकीय कर्मचाऱ्यांनी नुकसानीची नोंद करून घेतली. पण भरपाईची काहीच शाश्वती नसल्याने आम्ही उघड्यावरच आहे, अशी व्यथा रेश्मा प्रभुलकर यांनी मांडली. 

३ कुटुंबातील ६ चारचाकी, ८ दुचाकींची मोडतोड

वस्तीलगत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र दहशती हल्ल्यांनतर कोणीच फिरकले नसल्याचे आम्ही एकाकी पडल्याचे इमाम प्रभुळकर यांनी दुःख व्यक्त केले.  रेहमान प्रभुळकर या एकाच घरातील सहा मोटार सायकल व चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी येथील कुटुंबीयांनी केली आहे. या वस्तीतील तीन कुटुंबातील सहा चारचाकी, आठ मोटारसायकलिंचे मोडतोड केली.आयुब कागदी, रहमान प्रभुलकर, इमाम प्रभुलकर, शिराज प्रभुलकर, आयुब प्रभुळकर यांच्या गाडया निकामी केल्या आहेत.

नुकसानग्रस्तांची नावे -

गजापुरातील मुस्लिम वसाहतीतील महसूल व पोलीस विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. त्यामधील नुकसानग्रस्त असे : तय्यब महंमद नाईक, दिलावर उमरखान म्हालदार, दाऊद उस्मान नाईक, मुस्ताक अहमद नाईक, रेश्मा सिकंदर प्रभूलकर, महमद आसिफ उस्मान प्रभूलकर, रमजान उस्मान प्रभूलकर, नूरमहंमद कासम प्रभूलकर, आयुब कासम प्रभूलकर, जाहीर जब्बार म्हालदार, तमन्ना हुसेन महात, याकूब महंमद प्रभूलकर, इम्रान गणी मुजावर, रज्जाक कासम प्रभूलकर, सिराज कासम प्रभूलकर, रहेमान कासम प्रभूलकर, हमीद आदम प्रभुलकर, फुरकानअल्ली अब्दुल्ला कागदी, आब्बास आदम प्रभुलकर, जैनाबी सुलेमान प्रभूलकर, उस्मान गणी कासम प्रभूलकर, शब्बीर उस्मान गडकरी, रमजान इब्राहिम गडकरी, नौशाद आदम गोलंदाज, हुसेन कासम गोलंदाज आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात ११ चारचाकी, १४ मोटारसायकलीसह घरांचे नुकसान करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT