Vishalgad Encroachment संभाजीराजे यांना अटक करा

पोलिस अधीक्षकांचीही बदली करा; मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने मागणी
Demand on behalf of Muslim boarding
कोल्हापूर : मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने सोमवारी विशाळगडप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले.Pudhari File Photo

कोल्हापूर : विशाळगड प्रकरणी झालेल्या घटनेला सर्वस्वी जबाबदार असलेल्या संभाजीराजे यांना तत्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना शिष्टमंडळाने दिले. यावेळी हिंसाचार प्रकरणी पोलिस अधीक्षकांचीही बदली करावी, अशीही मागणी करण्यात आली.

Demand on behalf of Muslim boarding
विशाळगड अतिक्रमणांवर कारवाईची धमक दाखवा; बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार

रविवारी (दि. 14) काही समाजकंटकांनी पद्धतशीर नियोजनबद्धपणे विशाळगड अतिक्रमण विरोधातील आंदोलनाचे नियोजन केले होते. या आंदोलनाला काहींनी हिंसक वळण दिले. गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील घरांवर व प्रार्थनास्थळावर दगडफेक केली, तोडफोड केली. आई-बहीण व लहान मुलांना क्रूर पद्धतीने मारहाण केली. पुरोगामी कोल्हापूरला हे अशोभनीय आहे. या समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी तसेच दंगलचे सूत्रधार पुण्याचा रविंद्र पडवळ यांच्याकडून प्लानिंग करून याकरिता रसद पुरविण्यात आली, असा आरोप यावेळी करण्यात आला.

Demand on behalf of Muslim boarding
विशाळगड संकटात, गडावर जाणारच : संभाजीराजे आक्रमक

जमावबंदी आदेश असताना आंदोलन झाले कसे

जमावबंदी आदेश असताना हे आंदोलन झाले कसे, इतक्या संख्येने लोक आले कसे? असे सवाल करत ज्यांनी या आंदोलनाचे नियोजन केले होते, त्यांच्याकडूनच दर्ग्यावर हल्ला झाला. गजापूरमध्ये अतिक्रमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले. पोलिसांना मारहाण, पत्रकारांना धमकावणे असेही निंदनीय प्रकार घडले. या सर्व प्रकारात विविध गंभीर कलमे लावावी, अशी मागणी करण्यात आली.

Demand on behalf of Muslim boarding
Vishalgad Encroachment : पालकमंत्री मुश्रीफ यांनी आम्हाला पुरोगामित्व शिकवू नये : संभाजीराजे

पोलिस अधीक्षकांची ताबडतोब बदली करावी

विशाळगडावर जाणेकरिता एकच रस्ता आहे. त्यावरून पोलिसांनी हत्यारांसह समाजकंटकांना सोडण्यात आले. याला सर्वस्वी पोलिस प्रशासन जबाबदार आहे. गडावर अतिक्रमण हिंदू व मुस्लिमांचे आहे; पण मुस्लिम समाजावर हिंसाचार झाला. मुसलमानवाडीत पोलिसांनी सुरक्षा दिली नाही, तर बघ्याची भूमिका घेतली. यामुळे पोलिस अधीक्षकांची ताबडतोब बदली करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, शकील अत्तार, रफिक मुल्ला, शकील मुजावर, गुलाब मुजावर, सरफराज जमादार, कैश बागवान, सलीम अत्तार, अहमद मुजावर, सद्दाम मुजावर, जाकीरहुसेन बागवान आदी उपस्थित होते. दरम्यान, निवेदन देण्यापूर्वी मुस्लिम बोर्डिंग येथे बैठक झाली. या बैठकीत या घटनेचा आणि संभाजीराजे यांचा निषेध करण्यात आला.

Demand on behalf of Muslim boarding
Vishalgad Encroachment : संभाजीराजे पोलिसांत हजर; 21 संशयितांना अटक

शाहूंच्या वंशजाकडून जे घडले त्याचा तीव्र निषेध

वर्षांनुवर्षे एकोप्याने जगणारा मुस्लिम समाज भीतीमुक्त जगला पाहिजे. मात्र, अशा घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शाहूंच्या वंशजाकडून जे घडले त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकीसाठी हे सारे केले जात आहे का? याची चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

Demand on behalf of Muslim boarding
नांदेड : धर्माबाद कडकडीत बंद, मराठा समाजाच्या वतीने शासनाला दिले निवेदन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news