Vishalgad Encroachment : 60 जणांवर गुन्हे; 21 जणांना अटक

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटा कायम
Vishalgarh encroachment removal campaign
विशाळगड अतिक्रमण हटाव माेहीम.File Photo

कोल्हापूर/मलकापूर : विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलनावेळी विशाळगडसह पायथ्याला झालेल्या हिंसक घटनेप्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. दगडफेक, जाळपोळ, तोडफोड, पोलिसांवरील हल्लाप्रकरणी 60 जणांविरुद्ध शाहूवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी 21 जणांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, दुसर्‍या दिवशीही विशाळगडसह परिसरात तणावपूर्ण शांतता होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटा कायम ठेवण्यात आला आहे.

Vishalgarh encroachment removal campaign
विशाळगड संकटात, गडावर जाणारच : संभाजीराजे आक्रमक

अधिकार्‍यांसह 15 पोलिस जखमी

विशाळगड आणि पायथ्याला झालेल्या आंदोलनावेळी हिंसक जमावाला काबूत आणण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी प्रक्षुब्ध जमावाकडून झालेल्या दगडफेकीत गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, शाहूवाडीचे उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह 15 अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत, असे पोलिस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. यामध्ये शाहूवाडीचे निरीक्षक विजय घेरडे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक रणजित पाटील, मद्दसूर शेख, उपनिरीक्षक शेष मोरे, अमित पाटील, कॉन्स्टेबल विठ्ठल बहिरम, बालाजी पाटील, रोहित मर्दाने, जगताप यांचा समावेश आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात 60 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. त्यापैकी 21 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Vishalgarh encroachment removal campaign
विशाळगड अतिक्रमणांवर कारवाईची धमक दाखवा; बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार

विविध कलमान्वये 4 गंभीर गुन्हे दाखल

संशयितांविरुद्ध शाहूवाडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने बंदोबस्तावर असलेल्या अधिकार्‍यांसह पोलिसांवर दगडफेक, धक्काबुक्की, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गृह अतिक्रमण करणे, स्फोटक पदार्थांद्वारे आगळीक करणे, धार्मिकस्थळाची नासधूस, धार्मिक भावना भडकावणे, दुखावणे, स्फोटक पदार्थांद्वारे निष्काळजीपणाचे वर्तन, दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, बेकायदा जमाव करून शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे- पाटील यांनी सांगितले.

Vishalgarh encroachment removal campaign
पन्हाळगड, विशाळगड इतिहासावर सखोल संशोधनाची गरज

अफवाखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश

विशाळगड अतिक्रमणप्रकरणी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. समाजात कायदा-सुव्यवस्था निर्माण होत असतानाच काही समाजकंटक वेगवेगळ्या अफवा पसरवून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याची शक्यता असल्याने अशा समाजकंटकांचा छडा लावून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत, असेही सांगण्यात आले. नागरिकांनीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vishalgarh encroachment removal campaign
Vishalgarh: शेकडो ‘मशालीं’नी उजळला किल्ले विशाळगड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news