कोल्‍हापूर 
कोल्हापूर

कोल्‍हापूर : कबनूर ग्रामस्‍थांनी वाजत-गाजत कचरा टाकला थेट ग्रामपंचायत कार्यालयात

अमृता चौगुले

कबनूर (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : कबनूर डेक्कन रोडवरील मातंग समाज मंदिर शेजारील कचरा ग्रामपंचायतीने महिनाभर उचलला नाही. त्‍यामूळे कुंदन आवळे यांच्या नेतृत्वावाखाली संतप्त नागरिकांनी कचरा पोत्यामध्ये भरुन मिरवणूक काढत वाजत-गाजत ग्रामपंचायत कार्यालयात टाकला.

ग्रामपंचायतीत जाऊन सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील व ग्रा. वि. अधिकारी गणपत आदलिंग याना कुंदन आवळे यानी चांगलेच धारेवर धरले व ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कुंदन आवळे व उपसरपंच सुधीर पाटील यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यामुळे कांही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते.

कबनूरमध्ये वेळच्यावेळी कचरा उठाव होत नाही. मातंग समाज मंदिर शेजारी कचऱ्याचे ढीग लागले होते. कचरा कुजून दुर्गंधी सुटली होती. समाज मंदिरात अंगणवाडी भरते. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला जाग याववी यासाठी कचरा उचलून तो थेट वाजत- गाजत नेला. यावेळी सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाविरोधातील घोषणा देण्यात आल्‍या. या आंदोलनात मातंग समाजातील कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

हे ही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT