कोल्हापूर

कोल्हापूर : हजरत दौलत शाहवलींची श्री बिरदेव पालखीने घेतली भेट; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

मोहन कारंडे

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : श्री बिरदेव जन्मकाळ सोहळ्याच्या निमित्ताने धनगर समाज बांधवांनी बिरदेवाच्या पालखीने येथील ग्रामदैवत हजरत दौलत शाह वली यांच्या दर्गाहला भेट दिली. गेल्या अनेक वर्षांपासूनची पालखी दर्गाह भेटीची परंपरा धनगर समाज बांधवांनी अबाधित ठेवली आहे. या भेटीतून हिंदू- मुस्लिम ऐक्याचा संदेश धनगर बांधवांनी दिला आहे.

कुरुंदवाड येथे मोहरम, गणपती यासह सर्वच सण हिंदू, मुस्लिम, धनगर, जैन, लिंगायत असे अठरापगड जातीचे लोक एकत्रित येऊन साजरे करतात. महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराची ज्योत कुरुंदवाड शहरांमध्ये आजही दिव्य प्रकाशाप्रमाणे तेवत आहे. श्री बिरदेव जन्मकाळ सोहळ्याच्या निमित्ताने समस्त धनगर समाज बांधवांनी श्री बिरदेवाची पालखी मिरवणुकीने येथील हजरत दौलत शहावली दर्गाहला भेट देण्यासाठी आणली होती. धनगरी ढोलाच्या निनादात येळकोट- येळकोट जय मल्हार, बिरदेवाच्या नावाने, दौलतशाहच्या नावानं चांगभलं, अशा जय जयकाराने दर्गाह परिसर दणाणून सोडला होता. यावेळी दर्गाहचे मुल्ला मुस्तफा मुल्ला, मज्जिद मुल्ला यांनी बिरदेव पालखीच्या भेटीची खतम देऊन पालखीचे स्वागत करत जय जयकार केला. धनगर समाज बांधवांनी ही पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा आजही आबाधीत ठेवली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT