किणी; पुढारी वृत्तसेवा : १९ वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट टीमची माजी कप्तान श्रावणी देसाई हिची महाराष्ट्र प्रीमियर लीग वुमन क्रिकेट टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
पुणे येथील मॉडर्न कॉलेज मध्ये बी. कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या श्रावणीला लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. आठवी ते दहावी तिने सलग तीन वर्षे शालेय क्रिकेट मध्ये राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान कामगिरी करतानाच बेस्ट हिटर बॅट्समन व बेस्ट विकेट किपर म्हणून नाव कमावले आहे. अन्य क्रीडा प्रकारातही चांगली कामगिरी केली आहे. तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला आहे.
तसेच, तायकोंदो स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदकाची, तर सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू म्हणून तिने ठसा उमटवला आहे. १६ वर्षाखालील महाराष्ट्र वुमन्स क्रिकेट संघात तसेच १९ वर्षाखालील क्रिकेट संघात सलग दोन दोन वर्ष खेळल्यानंतर ती आता सीनिअर महिला संघात खेळत होती. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची महाराष्ट्र प्रीमियर लिगसाठी संघात निवड झाली.
सध्या ती पुणे येथे सराव करत असून यापुढेही चांगली कामगिरी करून आंतरराष्ट्रीय संघात खेळु शकेल असा विश्वास श्रावणीच्या परिवाराने व्यक्त केला. तिला माजी भारतीय महिला क्रिकेटपटू सोनिया डबीर, उपेंद्र कुलकर्णी सर तसेच हाडके सर तसेच आई व वडील सौ स्मिता देसाई आणि राजेंद्र देसाई यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा;