कोल्हापूर

Garbage van news | शिरढोणची लाखोंची कचरा उठाव करणारी वाहने दुरुस्तीअभावी खितपत

नवीकोरी ट्रॅक्टर-ट्रॉली व ई-बाईक वर्षभरापासून बंद; गावात कचऱ्याचे ढीग

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Shirdhon waste management vehicles damaged

बिरू व्हसपटे

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीने १४ व १५ व्या वित्त आयोगातून लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली कचरा उठावाची वाहने गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत पडून आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉली, ई-बाईक आणि अन्य साधने पाणीपुरवठा योजनेच्या जागेत गंजत पडली असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ट्रॅक्टर-ट्रॉली खरेदीसाठी सुमारे पाच लाख रुपये, तर ई-बाईकसाठी एक लाख रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला. मात्र किरकोळ दुरुस्ती न झाल्याने ही वाहने वापराविना पडून आहेत. सध्या केवळ एका टेम्पोद्वारे गावातील कचरा संकलन केले जात असल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे.

गेल्या वर्षभरापासून ही स्थिती कायम असूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बंद पडलेली वाहने तातडीने दुरुस्त करून कचरा उठावासाठी वापरात आणावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. त्यामुळे गावातील स्वच्छता व्यवस्था सुधारून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लाखोंची वाहने गंजत पडली..

ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर-ट्रॉली खरेदीसाठी सुमारे पाच लाख रुपये, तर ई-बाईकसाठी एक लाख रुपयांहून अधिक निधी खर्च केला. मात्र ही वाहने गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत पडून आहेत. सध्या केवळ एका टेम्पोद्वारे कचरा संकलन सुरू असून, ग्रामस्थांनी बंद पडलेली वाहने तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT