सादळे: येथील जंगलात मृत गव्याचे शवविच्छेदन करताना वन विभाग Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Gaur Death | सादळे येथे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळला गवा; शवविच्छेदनानंतरच उलगडणार मृत्यूचे कारण

गव्याच्या मृतदेहावर जखमा आढळून न आल्याने उष्माघात किंवा विषबाधेचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

Suspicious Wildlife Death

कासारवाडी : सादळे (ता. करवीर) येथील हॉटेल दुर्वांकुरच्या मागील बाजूस जंगल परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी एक पूर्ण वाढ झालेला गव्याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक तपासणीनंतर गव्याच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्या नसल्याने उष्माघात किंवा विषबाधा झाली असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक विकास घोलप आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण, रात्र झाल्यामुळे मंगळवारी सकाळी पशुवैद्यकांनी मृत गव्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. वनविभागाने पंचनामा करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली असून जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर गव्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्यता स्थानिक वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे.

मृत गव्याचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल.
- डॉ संतोष वाळवेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभाग कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT