Kolhapur Gaur Attack | शित्तूर वारूण येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; चौथ्या घटनेमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली

गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली
 Indian Bison Attack Farmer Killed
यशवंत यादवPudhari
Published on
Updated on

Shahuwadi Taluka Indian Bison Attack Farmer Killed

बांबवडे : शित्तूर - वारुण ( ता. शाहूवाडी ) येथील शेतकरी यशवंत मारुती यादव (वय 75) यांचा गवा रेड्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शिराळे मळा येथील शेतात मंगळवारी (दि.२) सकाळी ९ च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या भागातील ही चौथी घटना आहे, वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे शेतकरी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे. गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

 Indian Bison Attack Farmer Killed
Kolhapur News: कोल्हापुरात टोळीयुद्धातून टिंबर मार्केट गंजी माळ परिसरात गुंडांची दहशत, वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतकरी यादव हे आपल्या मालकीच्या शिराळे -मळा या शेतात नेहमीप्रमाणे गुरांना वैरण काढण्यासाठी गेले होते. उसाच्या शेतात वैरण काढत असताना अचानक बेफामपणे, सैरावैरा पळत आलेल्या गवा रेड्याने यादव यांना उसाच्या शेतात शिंगावर घेऊन आपटले आणि जमिनीस घुसळले, त्यानंतर पोटात शिंग खुपसले. डोक्यालाही दुखापत झाली. शेजारच्या शेतात वैरण काढणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडा - ओरडा केला असता गव्याने तिथून पळ काढला. 

गंभीर जखमी झालेल्या यादव यांना शेतातून उचलून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर - वारुण येथे आणले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले असता वाटेतच शेडगेवाडीच्या आसपास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news