कोल्हापूर

कोल्हापूर : राधानगरी पोलीस ठाण्यात बदल्यांचा खेळखंडोबा; पोलीसप्रमुख लक्ष घालणार काय?

मोहन कारंडे

राशिवडे; पुढारी वृतसेवा : चार, पाच महिन्यांपूर्वी  राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरिक्षक म्हणून रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्याही बदल्या झाल्या. पण बदलीच्या ठिकाणी अन्य कर्मचारी हजर होण्यास उत्स्तूक नसल्याने कारभारासह बदल्यांचा खेळखंडोबा सुरु आहे. त्यामुळे हा बदल्यांचा खेळखंडोबा वरिष्ठ अधिकारी थांबविणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राधानगरी पोलीस ठाणे आता वेगळ्याच विषयासाठी चर्चेत आले आहे. तत्कालीन पो.नि. आप्पासो कोळी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठाण्याचा चार्ज पो.नि.स्वाती गायकवाड यांनी घेतला. या ठाण्याला प्रथमच महिला अधिकारी मिळाल्याने शिस्तीचा कारभार होईल, असे अपेक्षित होते. परंतु चार महिन्यातच गायकवाड यांची बदली झाली व त्यांच्या ठिकाणी पो.नि.ईश्वर ओमासे यांनी पदभार स्विकारला. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांच्याही  नियमाप्रमाणे कार्यकाळ संपल्याने अन्य ठाण्यामध्ये बदल्या झाल्या. परंतू याठिकाणी बदल्या झालेले पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणी येण्यास उत्स्तूक नाहीत. काही कर्मचाऱ्यांनी राजकीय वजन वापरुन सोयीच्या ठिकाणी बदल्या करुन घेतल्या. यामुळे राधानगरी ठाण्यामध्ये  सध्या बदल्यांचा खेळखंडोबा रंगला आहे. तपास अंमलदाराची उणीव आहे. त्याचा भार अन्य अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये सुरु असणारा खेळखंडोबा जिल्हा पोलीस प्रमुख थांबविणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर बिटनिहाय  व पोलीस ठाण्यातून होणाऱ्या कारभाराचे नियोजनच विस्कटले आहे. याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT