

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मी असे ऐकले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात, असा दावा ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बाेलताना केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासंदर्भात माध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आठ आमदारांनी राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे. मी ऐकले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे आणि (सरकारमध्ये) काही बदल होऊ शकतात.
शिंदे गटाचे १७ ते १८ आमदारांनी आम्हाला संपर्क साधला आहे, असा दावा नुकताचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.