कोल्हापूर

कोल्हापूर: आंबा मतदान केंद्रावर निसर्ग पर्यटन जागवणारी थीम

अविनाश सुतार

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : आंबा (ता. शाहूवाडी) येथील मतदान केंद्रावर निसर्ग पर्यटन जागवणारी थीम मांडून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येथे निसर्ग स्थळे विकसित होत आहेत. घनदाट झाडी, अंबेश्वर देवराई, रमणीय घाट, करवंद, जांभूळ, कैरी या रान फळांवरील उत्पादने येथील महिला बचत गटाची वैशिष्ट्ये ठरली आहेत.

डिजीटल फलक प्रथमदर्शनी मतदारांचे स्वागत करीत आहेत. मतदार तसेच  नवमतदार या सेल्फी पाँइंटवर आपले मत नोंदवून 'तुम्ही या आणि मतदान करा, असा संदेश सोशल मीडियावर पाठवत होत आहेत. मतदाराबरोबर पर्यटन व्यवसायाला चालना मिळणारी ही थीम जिल्ह्याधिकारी अमोल येडगे व मुख्यकार्यकारी अधिकारी एस. कार्तिकीएन यांच्या संकल्पनेतून राबवली आहे. यासाठी
ग्रामसेवक सुभाष पाटील, बीएलओ संदिप पाटील, राजेंद्र लाड यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT