कोल्हापूर

कोल्हापूर: हुपरीत ‘लक्ष्य दहीहंडी’ कुटवाडच्या नरसिंह पथकाने फोडली

अविनाश सुतार

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : येत्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकवेल. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याचे लक्ष्य सर्वसामान्य कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचे आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा आणि हुपरी शहर व वंदे मातरम बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक लाख एक्कावन हजारांच्या 'लक्ष्य दहीहंडी' प्रसंगी ते बोलत होते. ४ गोविंदा पथकांनी  सहभाग घेतला. हुतात्मा स्मारकचे मैदान गर्दीने तुडुंब भरले होते. यावेळी कुटवाड येथील नरसिंह गोविंदा पथकाच्या गोविंदानी दही हंडी फोडून पारितोषिक पटकावले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, माजी पालकमंत्री  सतेज उर्फ बंटी पाटील, हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी आमदार उल्हासदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, महिला आघाडी जिल्हा संघटक मंगलताई चव्हाण, माजी आमदार राजू आवळे आदी उपस्थित होते.

यावेळी युवासैनिक शिवाजी मुरलीधर जाधव, अर्जुन जाधव, रघुनाथ नलवडे, राजेंद्र पाटील, संजय वांईगडे, विनायक विभूते, अमोल देशपांडे, भरत देसाई, भरत मेथे, अरूण गायकवाड व हुपरी शहरातील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक महिला आघाडीच्या वतीने नियोजन केले होते. स्वागत मुरलीधर जाधव यांनी केले. रघुनाथ नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. अण्णासाहेब बिलुरे यांनी आभार मानले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT