Radhanagari Dam
राधानगरी धरणाचे आज सायंकाळपर्यंत ५ दरवाजे उघडले Pudhari
कोल्हापूर

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजादेखील उघडला (पाहा Video)

पुढारी वृत्तसेवा
नंदू गुरव

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. ३, ४, ५, ६ आणि ७ व्या क्रमांकाच्या दरवाजामधून ७१४० क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून १५०० क्युसेक असा एकूण ८६४० क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Radhanagari Dam)

३, ४, ५ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे आधी खुले झाले होते. आता ७ व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला आहे.

याआधी चार दरवाजे उघडले होते, त्यावेळी राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात ७,२१२ क्यूसेक विसर्ग पाणी भोगावती नदीपात्रात सोडण्यात आले होते. आज दि. २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. ५ उघडला होता. सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी धरणाचा ६ नंबरचा दरवाजा खुला झाला होता. नदीकाठच्या लोकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात धुवाँधार कोसळत आहे. दमदार पावसामुळे राधानगरी धरण शंभर टक्के भरले आहे.

कोल्हापुरातील (दि.२५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता) राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४३ फूट ४ इंच (५४३.३९ मी) इतकी आहे. ६३००३ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. एकूण ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत

SCROLL FOR NEXT