कोल्हापूर

कोल्हापूर: अंबाबाईची सप्‍तमातृकाशक्‍ती रुपात महापूजा

अविनाश सुतार

कोल्‍हापूर: पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्‍सातील सातव्‍या माळेला शनिवारी करवीर निवासिनी अंबाबाईची सप्‍तमातृकाशक्‍ती रुपातील पूजा बांधण्‍यात आली होती. विश्वातील वेगवेगळ्या शक्ती ही एका आदिशक्तीचीच विविध रूपे आहेत, हे दर्शवणारी सप्तमातृकाशक्ति श्रीदेवी मातेची ही पूजा होती. दरम्‍यान, शुक्रवारी एका दिवसात २ लाख ४५ हजार ९६० भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. रविवारी अष्टमी दिवशी देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे.

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणि चामुण्डा सप्तमातरः ||

सर्व चराचर सृष्टी श्रीदेवी मातेच्या दिव्य तेजाशांतून निर्माण झाली. यामुळे 'एकैवाह जगत्यत्र द्वितीया का ममापरा' अर्थात अखिल ब्रह्मांडात मीच एकटी नित्य विद्यमान आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे कोण आहे? असे श्रीदेवीमाता म्हणते.

श्रीदेवी महात्म्याचा (सप्तशती) अकरावा अध्याय 'नारायणी स्तुती' या नावाने ओळखला जातो. या अध्यायात श्रीदेवीची स्तुती करताना म्हणले आहे, हे सर्व विश्व तू एकटीनेच व्यापलेले आहेस. याच अध्यायात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्री, चामुंडा या रूपात असणाऱ्या हे नारायणी तुला नमस्कार असो.' असे देवीचे स्तवन केले आहे. शनिवारची पूजा श्रीपूजक आशुतोष ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT