कोल्हापूर: अंबाबाई मंदिर ते शाहूवाडी शिव दौड ५ तास ३० मिनिटांत पूर्ण

कोल्हापूर: अंबाबाई मंदिर ते शाहूवाडी शिव दौड ५ तास ३० मिनिटांत पूर्ण
Published on
Updated on


विशाळगड: आपल्या संस्कृतीचा प्रसार व्हावा, खऱ्या अर्थाने देवीचा रात्री जागर व्हावा, याच उद्दात हेतूने कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर ते शाहूवाडी येथील अंबाबाई मंदिर अशी सुमारे ५० कि.मी. ची शिव दौड शाहूवाडीच्या मावळ्यांनी आणि रणरागिणींनी ५ तास ३० मिनिटांत पूर्ण केली.

विक्रमवीर शिवभक्त छोटी गिर्यारोहक अन्वी घाटगे हिच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून संस्कृती रक्षण शिव दौडला प्रारंभ झाला. ही दौड कोल्हापूर-बोरपाडळे-बांबवडे-शाहूवाडी या मार्गे काढण्यात आली. शिव दौडमध्ये कलावती चिरमुरे, पूनम मिरजे, वैशाली लाळे, ममता जाधव, रेवती भोपळे, समृद्धी भोपळे, हर्षदा मिरजे या रणरागिणी तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. झुंझार माने, प्रविण पांढरे, सचिन चौगुले, जय सुतार, चंद्रकांत म्हापसेकर, अमित देवकर, अमित अलमट्टी, सचिन कंड्रे, उत्तम पाटील, सोमनाथ जाधव सहभागी झाले होते. ही दौड ५० कि.मी. ५ तास ३० मिनिटांत पूर्ण केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news