कोल्हापूर: कासारी मध्यम प्रकल्‍प सध्या ३५ टक्के भरला आहे.  Pudhari News Network
कोल्हापूर

कोल्हापूर : कासारी धरण क्षेत्रात ९९८ मिमी पाऊस; धरण ३५ टक्के भरले

गतवर्षीपेक्षा २८६ मिलिमीटर जादा पाऊस

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : कासारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ९९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी  २८६ मिलिमीटर यावर्षी जादा पाऊस झाला आहे. त्यामुळे ०.२९ टीएमसी पाण्याची आवक जादा झाली आहे. पाणीसाठ्यातील वाढ ३१ दलघमी आहे. धरण सध्या ३५.३७ टक्के भरले असून  गतवर्षी याच दिवशी हा आकडा २५ टक्के होता. म्हणजेच गतवर्षीपेक्षा धरणात १० टक्के जादा पाणीसाठा आहे.

धरणातील पाण्याची सद्यस्थिती : 

  • गेल्या २४ तासात झालेला पाऊस – ७६ मिली मीटर

  • १ जूनपासून झालेला एकूण पाऊस – ९९८ मिली मीटर

  • गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस – ७१२ मिमी

  • धरणातील सध्याचा पाणीसाठा – ३५ टक्के

  • गेल्यावर्षी धरणातील पाणीसाठा – २५ टक्के

  • गेल्या २४ तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – ३१ दलघमी

  • १ जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – १९ टक्के

उपयुक्त पाणीसाठा २७.७९ द.ल.घ.मी 

कासारी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७५३ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडीतील २० तर पन्हाळ्यातील ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी मिळते. कासारी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्याना कासारी धरणातून पाण्याचा विसर्ग होता. प्रकल्पीय पूर्ण संचय पाणी पातळी ६२३ मी, पाणीसाठा ७८.५६ दलघमी, २.७७४ टीएमसी असून सध्या  धरणाची पाण्याची पातळी ६१०.६० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा २७.७९ द.ल.घ.मी  आहे. धरणात ०.९८ टीएमसी पाणीसाठा आहे.

धरणातून प्रतिसेकंद २५० क्यूसेस विसर्ग सुरु

गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा १९.४४ दलघमी इतका होता. तर धरण ०. ६९ टीएमसी इतके भरले होते. गतवर्षीपेक्षा धरणात १० टक्के पाणीसाठा जादा आहे. सध्या धरणातून कासारी नदी पात्रात प्रतिसेकंद २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ७६ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. मागील काही वर्षांतील पाऊस पाहिला असता साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर धरणांतर्गत विभागात अपेक्षित असा दमदार पाऊस पडतो आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT