पुरोगामी कोल्हापूर हादरलं! गुप्तधनासाठी नरबळीचा संशय?

कौलव येथे घरात खड्डा खोदून सुरू होतं अघोरी कृत्य, ६ जणांना अटक
Kolhapur News
गुप्तधनासाठी कौलव येथे घरात खड्डा खोदून अघोरी कृत्य सुरू होतं. file photo
Published on
Updated on

कौलव : कौलव (ता. राधानगरी) येथे गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशाने केलेला अघोरी प्रकार सतर्क ग्रामस्थ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उध्वस्त करत बुवाबाजीचा पर्दाफाश केला. या घटनेने परिसर हादरला आहे. सहा जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351(२) ३(५) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकाराने कौलवसह जिल्ह्यात खळबळ माजली असून संतापाची लाट उसळली आहे.

घरात सुरू होता मोठमोठ्याने मंत्रोच्चार

याबाबत राधानगरी पोलीस ठाणे व प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कौलव येथे मुख्य रस्त्यावर शरद धर्मा माने यांचे घर आहे. मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सरपंच रामचंद्र कुंभार हे त्यांच्या घराजवळ गेले असता तेथे काही अनोळखी इसम दिसून आले. तेव्हा कुंभार यांनी पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य व अन्य लोकांना बोलावून घेतले. हे सर्वजण माने यांच्या घरात गेल्यानंतर सोप्यामध्ये एका चटईवर केळीच्या पानावर हळद-कुंकू, गुलाल, सुपारी, पानाचे विडे व टाचण्या लावलेले लिंबू अशी पूजा करत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये चंद्रकांत महादेव धुमाळ हा रुदाक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घालून मंत्रोच्चार करत होता. त्याच्या शेजारी शरद माने हा बसला होता.

Kolhapur News
कोल्‍हापूरचे बनले 'मिर्झापूर'..! तीन महिन्‍यात 'ओटीटी' स्‍टाईल तीन मर्डर...

देवघरात खोदला होता ३ फुटांचा खड्डा

हे कृत्य अनिष्ट व अघोरी प्रथा असल्याचे लक्षात आल्याने सरपंच कुंभार, माजी उपसरपंच अजित पाटील व अन्य लोक आतील खोलीत गेले. देवघरासमोर अंदाजे तीन ते चार फुटाचा खड्डा काढला होता. खड्ड्याच्या बाजूला उकरलेली माती पडली होती. चारही बाजूंना लिंबू व पानाचे विडे ठेवलेले होते. याबाबत फिर्यादी पाटील यांनी आरोपींना विचारले असता संतोष निवृत्ती लोहार याने सदर खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे असे सांगितले. तर आशिष रमेश चव्हाण याने येथून निघून जावा अन्यथा तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदरची फिर्याद माजी उपसरपंच अजित राजाराम पाटील यांनी दिली आहे.

अघोरी कृत्याची गेल्या १५ दिवसांपासून गावात चर्चा

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश सरचिटणीस कृष्णात स्वाती, प्रा. विश्वास पाटील व अन्य सदस्य तेथे दाखल झाले होते. पोलिसांना माहिती दिल्यानंतर राधानगरीचे पोलीस तात्काळ दाखल झाले. त्यांनी शरद धर्मा माने (रा. कौलव), महेश सदाशिव माने (रा. राजमाची जि. सातारा), आशिष रमेश चव्हाण (रा. मंगळवार पेठ, कराड), चंद्रकांत महादेव धुमाळ (रा. मंगळवार पेठ, कराड), संतोष निवृत्ती लोहार (रा. वाझोली ता.पाटण) आणि कृष्णात बापू पाटील (रा. पुलाची शिरोली) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. गावात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांनी माने याच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती. याबाबत गावात गेले पंधरा दिवस दबक्या आवाजात चर्चा होत होती. हा प्रकार उघडकीस येताच ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार सर्वांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडला गेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news