कोल्हापूर

कोल्‍हापूर : करंजिवणे तलाव तुडुंब भरला; ७ गावांचा पाणी प्रश्न मार्गी

निलेश पोतदार

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा करंजीवने ता.कागल येथील लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. 68 मीटर लांबीच्या सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे करंजीवने व हळदवडे येथील 175 एकर शेतीसह सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या वर्षी हा तलाव 6 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी मंगळवार दि. 25 रोजी जुलै रोजी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.

करंजीवने गावची भौगोलिक रचना लक्षात घेऊन तत्कालीन आमदार सदाशिवराव मंडलिक यांनी शेतीला व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून या लघुपाटबंधारे तलावाला 10 जून 1985 ला मंजुरी मिळवून दिली. 1989 मध्ये हा तलाव पाणी साठवण करण्यास तयार झाला. यात तलावाच्या भिंतीची लांबी 412 मीटर असून, उंची 21 मीटर आहे. तलावाचे पाणलोट क्षेत्र 6.32 चौ.की.मी इतके आहे. तर उपयुक्त पाणी साठा 61.32 द.ल.घ. इतका आहे. करंजीवने येथील शंभर एकर व हळदवडे येथील 75 एकर शेतीला पाणी पुरवले जाते.

शेतीला पाणीपुरवठा करण्याबरोबरच करंजीवने, हळदवडे, हळदी, बोळावी, बोळावीवाडी, दौलतवाडी, पळशिवणे या गावाला पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे शेतीच्या पाणी प्रश्ना बरोबर या सात गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT